रविवार, ८ मार्च, २००९

अवघड वाट - महेश घाटपांडे

.

जखमा सुगंधी आहेत म्हणुन
जन्मभर जपतो आपण
आभाळाच्या कुशीत शिरुन
ढगात दूर लपतो आपण...
...
छप्पर असतं, भिंती असतात
पण भान नसतं आपल्याला
पापण्या सुद्धा बंद पुकारतात
आसवांचे ओझे पेलायला...

अश्यावेळी,

अश्यावेळी आपण शोधतो
शीतल पाण्याचा एक पाट
त्यासाठी आपल्याला मंजुर असते
काटेभरली अवघड वाट..
...
आश्चर्य आहे ना...?



.

1 टिप्पणी:

  1. पापण्या सुद्धा बंद पुकारतात
    आसवांचे ओझे पेलायला..
    सुरेख जमली आहे कविता.. पुढिल लिखाणाकरिता शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा

ही कविता वाचून कसे वाटले? कलाकाराला त्याच्या कलाकृतीची दाद मिळाली तर त्याचा उत्साह वाढतो, हो ना? मग तुम्ही तुमची प्रतिक्रीया नक्की नक्की इथे लिहून जा. मी या कवितेच्या निर्मितीकाराजवळ तुमची प्रतिक्रीया पोहोचवेन. आणि हो कवितेखाली जी लिंक आहे तिथे जाऊन थेट त्या कलाकाराला पण तुम्ही प्रतिसाद देऊ शकता.