शनिवार, ७ मार्च, २००९

मुलाखत: संतोष बडगुजर

नमस्कार मंडळी,

आज संतोष बडगुजर यांची मुलाखत सादर करतोय. सुबोध साठे यांच्या साईट वर अजूनही कळेचना हे संतोष बडगुजर यांचे गाणे सध्या गाजतेय, आणि हेच गाणे कुणाल गांजावाला यांच्या आवाजात लॉटरी लागली रे या चित्रपटात घेतले गेले आहे.  संतोष बडगुजर यांचे आवडणा~या कविता ब्लाग तर्फे अभिनंदन.  चला तर मग संतोष बडगुजर यांना काही प्रश्न विचारूयात.

तुम्ही कविता कधी पासून करायला लागलात?
कवितांच वेड तस फार पुर्वीपासुनच, जेव्हा कळायला लागल अगदी तेव्हापासुनच, सहावी सातवीत असेन तेव्हा ह्या वेडाला अजुन गती मिळाली आणि ती आजतागायत कायम आहे.

तुमच्या कवितांबद्दल काही सांगा
मला विशिष्ठ प्रकारात लिहीत रहाण आवडतच नाही. जेव्हा जे सुचेल आणि जस सुचेल तस लिहीत रहातो. त्यात गझल हा अगदी जिव्हाळ्याचा काव्यप्रकार.

तुम्हाला कोणते कवी अधिक आवडतात?
मंगेश पाडगावकर, सौमित्र, सुरेश भट हे माझे आवडते कवी .. पण बरेचदा चटका लावुन जाणाऱ्या ग्रेसच्या कविताही खूप आवडतात. याशिवाय वि. स. खांडेकरांच्या लिखाणातली जादु अजुनही भुरळ पाडते

तुमच्या कवितांवर कुणाचा अधिक प्रभाव आहे असे तुम्हाला वाटते?
माझ्या कवितांवर प्रभाव असतो तो वाचनात किंवा अनुभवात आलेल्या काही घटनांचा, किंवा बरेचदा तर एखाद्या आवडलेल्या कवितेचाही.

तुमच्या बद्दल माहिती द्या
माझे नाव संतोष बडगुजर, संतोष .. कवितेतला या नावाने बरेच लिखाण केले, लहानपनापासुन वाचनाची भयान आवड होती. त्याचीच छाप बरेचदा कदाचीत माझ्या कवितांमधुनही दिसत असावी. जन्मगाव पुणे.

संतोष बडगुगर यांना आवडणारी त्याची एक कविता


अजुनही कळेच ना
कश्या कळ्या फुलेच ना
अजुन वाट पाहतो
तुझी छटा दिसेच ना

अजुनही असा कसा
उदास चंद्रमा नभी
अजुन रात एकटी
अशी कशी ढळेच ना

दुर कुठुनीतरी
गातसे कुणीतरी
अजुन श्वास मारवा
सुरांतुनी भरेच ना

चांदणे नभातले
भान आज हरपले
चांद एकटा नभी
का मला कळेचना

सोड तु अता सखे
लाजणे फुलापरी
श्वासही जरा जरा
बंदिशी भरेचना

काय रात बोलते
सांगतो तुला अता
स्पर्श वाहता तुझा
मी मला भुलेचना

कोणता खरा खुरा
मोगरा मनातला
कोणती अनोळखी
स्पंदने कळेचना

भासही तुझा सखे
आज हासतो मला
पाहता समोरूनी
पापणी भिडेचना

1 टिप्पणी:

  1. कविता भिकार आहे...

    स्पंदने कळेचना
    कश्या कळ्या फुलेचना
    बंदिशी भरेचना

    हे सर्व व्याकरण व भाषेनुसार चूक आहे..

    संतोषच्या इतर काही कविता सुंदर आहेत...

    शुभेच्छा पुढील प्रवासास..

    उत्तर द्याहटवा

ही कविता वाचून कसे वाटले? कलाकाराला त्याच्या कलाकृतीची दाद मिळाली तर त्याचा उत्साह वाढतो, हो ना? मग तुम्ही तुमची प्रतिक्रीया नक्की नक्की इथे लिहून जा. मी या कवितेच्या निर्मितीकाराजवळ तुमची प्रतिक्रीया पोहोचवेन. आणि हो कवितेखाली जी लिंक आहे तिथे जाऊन थेट त्या कलाकाराला पण तुम्ही प्रतिसाद देऊ शकता.