शुक्रवार, ६ मार्च, २००९

लक्ष्मणरेषा - विजय कुमार

.

प्रत्येकाची एक लक्ष्मणरेषा असते
माझ्याजवळ येताना
आपण धोक्याची पातळी 
ओलान्डतोय याचे भान राखा.......

मी उभारलेल्या माझ्या तटबंदीत
माझे साम्राज्य आहे !
माझ्या कवितेला 
काळोख्या रात्रीची ओढ आहे !

तुमचे दिप इथे आणू नका,
माझ्या अंधाराला भ्रष्ट करू नका !
ह्या अंधारात रक्ताचे दिप जळतात !
त्या धगीत माझी कविता बहरते !

तुमच्या लक्ष्मणरेषेत तुम्ही रहा !
माझी लांघु नका ....
नव्या वादळाला आमंत्रण देऊ नका !

मला जगू द्या तटबंदीत,
पीऊ दे माझ्या कवितेस अंधार !
मीच जर धोक्यात जगतोय
तर
तुम्हास इथे मी का ओढू ?

०४.०६.२००८

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून कसे वाटले? कलाकाराला त्याच्या कलाकृतीची दाद मिळाली तर त्याचा उत्साह वाढतो, हो ना? मग तुम्ही तुमची प्रतिक्रीया नक्की नक्की इथे लिहून जा. मी या कवितेच्या निर्मितीकाराजवळ तुमची प्रतिक्रीया पोहोचवेन. आणि हो कवितेखाली जी लिंक आहे तिथे जाऊन थेट त्या कलाकाराला पण तुम्ही प्रतिसाद देऊ शकता.