अनोळखी वाटेवर दिसले
ओळखीचे काही ठसे...
मनात वाटलं...वाटलं...
का नशीब फ़ेकतयं असे,
पुन्हा फ़िरुन तेच ते फ़ासे...
पण आता तस ठरवलं होतच...
उगाच आहरी नाही जायचं भावनेच्या..
कितीही काही झालं तरी,
पुन्हा नाही करुन घ्यायचे स्वत:चे हसे...
म्हणुन वाट बदलायचा चाललायं प्रयत्न...
पण....पण प्रत्येक वेळी प्रत्येक वाट,
तुझ्या आठवांचे पुसट ठसे घेऊन समोर येते...
ठरवलं कितीही तरी नकळत पापणी ओलावून जाते...
का होत असं???
वाटा छळवाद मांडतात??...की..
की माझं मनचं छळवादी?...तेच अडकलयं....?
अजुनही तुझ्या आठवांच्या देशात.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही कविता वाचून कसे वाटले? कलाकाराला त्याच्या कलाकृतीची दाद मिळाली तर त्याचा उत्साह वाढतो, हो ना? मग तुम्ही तुमची प्रतिक्रीया नक्की नक्की इथे लिहून जा. मी या कवितेच्या निर्मितीकाराजवळ तुमची प्रतिक्रीया पोहोचवेन. आणि हो कवितेखाली जी लिंक आहे तिथे जाऊन थेट त्या कलाकाराला पण तुम्ही प्रतिसाद देऊ शकता.