.
तू दिसलीस आणिक माझ्या
बघण्याचे झाले गाणे
तू हसलीस रिमझिम रिमझिम
जगण्याचे झाले गाणे
.
तू हळवी झालीस जेव्हा
बेधूंद बहरला चाफा
तू मिठीत अलगद माझ्या
शिरण्याचे झाले गाणे
.
हातात घेतला हात
तू आश्वासक डोळ्यांनी
डोलते अधांतर माझे
फिटण्याचे झाले गाणे
.
तू जपले माझे अश्रू
तू टिपली माझी स्वप्ने
स्नेहात चिंब भिजलो मी
भिजण्याचे झाले गाणे
.
तू अर्थ नवा जगण्याचा
तू हाक नवी आशेची
तू फुकरल्या जखमांच्या
मिटण्याचे झाले गाणे
.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही कविता वाचून कसे वाटले? कलाकाराला त्याच्या कलाकृतीची दाद मिळाली तर त्याचा उत्साह वाढतो, हो ना? मग तुम्ही तुमची प्रतिक्रीया नक्की नक्की इथे लिहून जा. मी या कवितेच्या निर्मितीकाराजवळ तुमची प्रतिक्रीया पोहोचवेन. आणि हो कवितेखाली जी लिंक आहे तिथे जाऊन थेट त्या कलाकाराला पण तुम्ही प्रतिसाद देऊ शकता.