सोमवार, २४ नोव्हेंबर, २००८

मी शोधते मला - दीपा

मी चंचल 
मी अवखळ 
मी निर्मळ 
वाहता झरा ...मी शोधते मला 

मी अथांग 
मी अफ़ाट 
मी विशाल 
तरी प्रत्येक थेंब खरा ...मी शोधते मला 

मी मादक 
मी मोहक 
मी शापित 
जरी अप्सरा ... मी शोधते मला 

मी हुरहुर 
मी थरथर 
मी कातर 
सायंतारा ... मी शोधते मला 

मी हिरवाई 
मी वनराई 
मी आई 
वसुंधरा ... मी शोधते मला 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून कसे वाटले? कलाकाराला त्याच्या कलाकृतीची दाद मिळाली तर त्याचा उत्साह वाढतो, हो ना? मग तुम्ही तुमची प्रतिक्रीया नक्की नक्की इथे लिहून जा. मी या कवितेच्या निर्मितीकाराजवळ तुमची प्रतिक्रीया पोहोचवेन. आणि हो कवितेखाली जी लिंक आहे तिथे जाऊन थेट त्या कलाकाराला पण तुम्ही प्रतिसाद देऊ शकता.