सगळ्यांना मित्रं-मैत्रिणी असतात .... मलाही आहेत...
पण तु माझा "सखा" आहेस....
त्या निळ्या,मिश्किल कृष्णासारखा..... अथांग.....
काहितरी शोधत होते.... युगोनयुगे....
ते तुझ्याकडे आहे... अगदी शुद्ध स्वरुपात.....
फुलांवरून हात फिरवत असताना... आई गं!
टचकन काटा रुतला मला... तलमळले....मनापासून कळवळले!
शोधला काटा... पण बहुतेक फुलंच टोचलं असेल मला.....
तु बघत होतास स्थित्यंतरं ...... स्थितप्रज्ञासारखा!
त्या बेसावध क्षणी.... मी भान विसरले,
तुही माझा हात धरलास.... किंबहुना मला तरी तसे वाटले....
आणि आपण्निघालो त्या क्षितिजाकडे...
केव्हाच पोहोचलो असतो ..... अल्याड काय अन् पल्याड काय!
पन तु माझा हात सोडलास ......!!!!! म्हणालास.....
"चल जा! मार भरारी....मी आहे इथेच..."
मी चमकून बघीतले तुझ्याकडे आणि क्षणात मळभ दुर झाले.....
मी पिसाहून हलकी होउन उडाले...
कुठेही असेन मी आकाशात....
खात्री आहे मला.... माझ्याकडे त्याच अनिमिष नेत्रांनी बघत असशील तु...... नितळतेने भरलेल्या.....
म्हणुनच तु माझा "सखा" आहेस..... सर्वसमावेशक असा!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही कविता वाचून कसे वाटले? कलाकाराला त्याच्या कलाकृतीची दाद मिळाली तर त्याचा उत्साह वाढतो, हो ना? मग तुम्ही तुमची प्रतिक्रीया नक्की नक्की इथे लिहून जा. मी या कवितेच्या निर्मितीकाराजवळ तुमची प्रतिक्रीया पोहोचवेन. आणि हो कवितेखाली जी लिंक आहे तिथे जाऊन थेट त्या कलाकाराला पण तुम्ही प्रतिसाद देऊ शकता.