मंगळवार, १८ नोव्हेंबर, २००८

माझ्यावर प्रेमच नाही म्हणतेस

हाताला तुझ्या टोचते सुई
आणि मी जातो निघून..तेव्हां
हलकेसे दुखरे स्मित करून
तू नुसतीच मान हलवतेस

माझ्यावर प्रेमच नाही म्हणतेस..

सुट्टीत तुझ्या मनातली सहल
आणि मी खिसा चाचपतो..तेव्हा
तू डबडबडबलेल्या डोंळयांनी
तडक आत निघून जातेस
माझ्यावर प्रेमच नाही म्हणतेस..

दिवाळीला सोन्याचा दागिना
माझी नजर तुला टाळत राहते
मंगळसूत्राशी चाळा करीत
तू निःशब्दपणे बोलत राहतेस..

माझ्यावर प्रेमच नाही म्हणतेस..

कसं सांगू, डोक्यात हजार प्रश्न
बॊसची धमकी, घाणेरडे राजकारण
लंबुळका खिसा, फाटकी स्वप्ने
आणि काही अपघाताच्या जागा !!

सगळं टाळून, वाचत, वाचवत,
स्वतःला जपत तुझ्याचसाठी..
तुला तोंड द्यायला येतो..
तरीतू तोंड फिरवून घेतेस.....

माझ्यावर प्रेमच नाही म्हणतेस..!

प्रेम आणि दुसरे काय असते ग ?

अनिल भारतीयन
(बघा इथे आणि इथे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून कसे वाटले? कलाकाराला त्याच्या कलाकृतीची दाद मिळाली तर त्याचा उत्साह वाढतो, हो ना? मग तुम्ही तुमची प्रतिक्रीया नक्की नक्की इथे लिहून जा. मी या कवितेच्या निर्मितीकाराजवळ तुमची प्रतिक्रीया पोहोचवेन. आणि हो कवितेखाली जी लिंक आहे तिथे जाऊन थेट त्या कलाकाराला पण तुम्ही प्रतिसाद देऊ शकता.