बुधवार, २६ नोव्हेंबर, २००८

नास्तिक - आसावरी

"डोळे मीट", ते म्हणाले 
आणि मला तर ओढ़ तुझ्या नजर भेटीची !

"हात जोड़", ते उद्गारले 
आणि माझे हात आसुसलेले तुला सर्वांगाने कवलायला 
जस धावत जाऊन समुद्र मिठीत घ्यावासा वाटतो ना, तसच!

"मस्तक झुकव. लीन हो!"
पण का? खाली बघून संवाद कसा घडायचा? 

त्यानी आर्त वेदनांची गाणी म्हणायला सांगितली
आणि माझ्या मनात तर थुई थुई आनंदाची कारंजी! 
.
.
खरच मी नास्तिक ठरले!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून कसे वाटले? कलाकाराला त्याच्या कलाकृतीची दाद मिळाली तर त्याचा उत्साह वाढतो, हो ना? मग तुम्ही तुमची प्रतिक्रीया नक्की नक्की इथे लिहून जा. मी या कवितेच्या निर्मितीकाराजवळ तुमची प्रतिक्रीया पोहोचवेन. आणि हो कवितेखाली जी लिंक आहे तिथे जाऊन थेट त्या कलाकाराला पण तुम्ही प्रतिसाद देऊ शकता.