मंगळवार, ३ मार्च, २००९

सखे ग - प्राजक्ता खाडिलकर

.

नको नको ग संभाळू 
काजव्यांचे व्रण मुठी 
मूठ उघड.. होईल 
फुलपाखरांची दाटी..

नको नको सखे म्हणू 
वाट कुरतडलेली 
धुंदमदिर गंधाने 
पावलाला डसलेली..

पहाटेच्या वारियाला 
सांजचाहूल चाहूल 
नभवेलीवर खुळे
शुक्रचांदणीचे फूल.. 

अंधाराच्या गूढगर्भी 
रानजाई फुले फुले 
अन काजळडोहात 
सूर्यबिंब उमलले..

.

1 टिप्पणी:

  1. अंधाराच्या गूढगर्भी
    रानजाई फुले फुले
    अन काजळडोहात
    सूर्यबिंब उमलले..

    फारच सुंदर.

    उत्तर द्याहटवा

ही कविता वाचून कसे वाटले? कलाकाराला त्याच्या कलाकृतीची दाद मिळाली तर त्याचा उत्साह वाढतो, हो ना? मग तुम्ही तुमची प्रतिक्रीया नक्की नक्की इथे लिहून जा. मी या कवितेच्या निर्मितीकाराजवळ तुमची प्रतिक्रीया पोहोचवेन. आणि हो कवितेखाली जी लिंक आहे तिथे जाऊन थेट त्या कलाकाराला पण तुम्ही प्रतिसाद देऊ शकता.